च्यवनप्राश
आवळा, शतावरी, मध, रक्तचंदन, गायीचे तूप, या सारख्या अन्य नैसर्गिक घटकांनी बनविला जातो. नैसर्गिकरित्या रोग प्रतिकारक क्षमता वाढवणारे.
कुटुंबाच्या संपूर्ण स्वास्थ्यासाठी परिपूर्ण नैसर्गिक टॉनिक.
२५०० वर्षां पूर्वीचा आयुर्वेदातील ग्रंथोक्त फॉर्मुला !
पवित्र रस्ता आणि युद्धातील विजय !!
Defense is The First Act of War.
गोष्ट आहे पहिल्या महायुद्धातली. दिनांक 21 फेब्रुवारी 1916. जनरल फाल्कनहायमनच्या नेतृत्वाखाली जर्मनीच्या प्रचंड फौजेने 1200 तोफांसह पश्चिम आघाडीवर फ्रान्सच्या सीमेवरील वेर्दन शहरावर चढाई केली. डझनभर छोट्या मोठ्या किल्ल्यांचा हा प्रांत म्हणजे फ्रान्सची राष्ट्रीय अस्मिता. पण जर्मन सैन्य पूर्वेकडील युद्धात गुंतलेले असल्याने गाफील राहिलेल्या फ्रान्सला वेर्दन वरील हल्ला म्हणजे अनपेक्षित धक्काच. केवळ 50 – 60 सैनिकांची तुकडी असलेला डोरमाऊंट किल्ला चारच दिवसात फ्रान्सने गमावला.
संरक्षण तज्ञ असलेल्या आणि कधीही पराभव न पाहिलेल्या जनरल फिलिप पेटन कडे फ्रान्सने वेर्दन वाचवायची जबाबदारी दिली. युद्धकुशल पेटन ने आपल्या सैन्याच्या अनेक तुकड्या बनवल्या. त्याच्या योजनेनुसार प्रत्येक तुकडी पूर्ण थकण्याआधीच नव्या दमाची नवीन तुकडी शत्रूवर तुटून पडे. जर्मन सैन्य वेगवेगळे डावपेच आखून वेर्दनच्या विविध किल्ल्यांवर हल्ले करत असे. पण पेटनने त्यांना अनेक महिने झुंजविले. यासाठी महत्त्वाचे होते नविन सैन्याची कुमक, त्यांच्यासाठी अन्नधान्य आणि मुबलक दारुगोळा यांचा अविरत पुरवठा होत राहणे. वेर्दन कडे येणार्या एकमेव रस्त्यामुळे हे सर्व शक्य होत होते आणि त्यासाठी या रस्त्याची सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याची पराकाष्ठा जनरल पेटनने केली होती. जर्मन सैन्य गलितगात्र झाले त्यवेळी फ्रान्सने जनरल रॉबर्ट नेव्हील ला मोठ्या फौजफाट्यासह वेर्दनला पाठवले. आता वेर्दन सारखा मोक्याचा प्रांत जिंकण्याची जर्मन सैन्याची आशा मावळू लागली. डिसेंबर मध्ये बर्फ पडू लागल्यावर जर्मनीने कायमची माघार घेतली. तो दिवस होता 18 डिसेंबर 1916. तब्बल 10 महिने चाललेली ही लढाई जगातील सर्वात लांबलचक लढाई म्हणून इतिहासात नमूद आहे. वेर्दन कडे जाणारा तो रस्ता ‘La Voie Sacree’ म्हणजेच ‘पवित्र रस्ता’ या नावाने अमर झाला.
या लढाईतून मिळालेले धडे
1. युद्धकाळात शत्रूला गृहित धरून गाफील राहू नये.
2. आघाडीवर असणार्या सैन्याची दमछाक होण्याआधीच नविन तुकडी सज्ज ठेवावी.
3. युद्ध कितीही काळ लांबले तरी आपले धैर्य आणि चिकाटी सोडू नये.
4. आपल्या सैन्याची रसद कधीही थांबणार नाही याची काळजी घ्यावी.
5. *स्व संरक्षण हे युद्धातील प्रथम कर्तव्य होय.*
आयुर्वेदात च्यवनप्राशला श्रेष्ठ ‘रसायन’ म्हंटले आहे. रसायन म्हणजे ‘Chemical’ हा प्रचलित अर्थ आयुर्वेदाला अभिप्रेत नाही. *रसायन हा रस + अयन असा शब्द आहे.* रस म्हणजे अन्नपचननंतर निर्माण होणारा सर्व पोषणमूल्य असणारा द्रव पदार्थ. तर अयन म्हणजे विविध systems कडे जाणारे channels किंवा रस्ते. जेंव्हा शरीरातील एखाद्या system वर जंतूंचे आक्रमण होते तेव्हा त्यांचा प्रतिकार करण्यासाठी सैनिक पेशींना त्या system पर्यंत त्वरित पोहोचणे आवश्यक असते. लढून दुर्बल झालेल्या पेशींची जागा नव्या दमाच्या पेशींनी घेणे आवश्यक असते. तसेच लढणार्या पेशींना पुरेसे व योग्य पोषण अविरत मिळणे गरजेचे असते.
आयुर्वेदातील रसायन गटातील औषध ही या channels ना सुरक्षित आणि व्यवस्थित ठेवण्याचे कार्य करतात. च्यवनप्राश मुळे शरीरातील सर्व systems कडे जाणारी channels स्वच्छ व स्वस्थ होतात. अगदी Lockdown मध्ये ट्रॅफिक जाम नसलेल्या मोकळ्या रस्त्यांसारखी. शिवाय पोहोचला जाणारा रस हा अधिक पौष्टिक आणि औषधि गुणधर्मांनी युक्त असतो. जंतु संसर्गावर विजय मिळविण्यासाठी आपल्या शरीरात असे अनेक *La Voie Sacree पवित्र रस्ते* तयार करण्यासाठी च्यवनप्राश सारखा जनरल पेटन हवाच. नाही का?
*किसमें कितना है दम.. !!*
Hence that General is skillful in attack whose opponent does not know what to defend and he is skillful in defense whose opponent does not know what to attack.
– Lessons from Sun Tzu (Art of War)
What the Bhagavad Gita and Kautilya’s Arthashastra are to India, Sun Tzu’s Art of War and Wu Chi’s treatise on the same subject, are to China.
#Immunity #boostImmunity #COVID19 #CovidImmunity
साम्राज्य विस्ताराकरिता आपल्या देशाच्या सीमा वाढवण्यासाठी अनेक देश शेजारील देशांवर आक्रमण करतात. ऐतिहासिक काळात अगदी १९ व्या शतकाच्या अंतापर्यंत, शत्रूचे किल्ले काबीज करणे हेच युद्धाचे महत्त्वाचे ध्येय असे. कारण एखादा गड/किल्ला जिंकल्यावर आपसूकच त्याच्या भोवतालचा प्रदेश जेत्यांच्या वर्चस्वाखाली येत असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बालवयातच तोरणा किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली. आणि त्यानंतर अनेक गड सर करून स्वराज्य बळकट केले. हे करताना केवळ साहस आणि शौर्य नव्हे तर बुद्धीचातुर्य आणि कल्पकतेचाही वापर केला. अर्थात त्यांच्या प्रत्येक मोहिमेतून ते आपणास पाहावयास मिळते.
युद्ध प्रदेशाचा बारकाईने अभ्यास, काळाची अनुकूलता, शत्रूची बलस्थाने आणि कमकुवतपणा यांचे योग्य मूल्यमापन करून शत्रू गाफील असताना किंबहुना शत्रूला गोंधळात टाकून त्याच्यावर चढाई करत, त्यांच्या किल्ल्यांवर विजय पताका फडकविल्या. हे महाराजांच्या गनिमी काव्याचे वैशिष्ट्ये होते. मग जिंकलेल्या किल्ल्यांचे योग्य व्यवस्थापन आणि संरक्षण हे पुढचे धोरणही लगेच आखले जाई.
* तोच सेनानायक कुशल समजावा – १) जेंव्हा तो आक्रमण करतो तेव्हा कशाचे रक्षण करायचे (काय वाचवायचे) हे शत्रूला समजत नाही, आणि २) जेंव्हा तो संरक्षण करतो तेव्हा कुठे आक्रमण करावे हे शत्रूला उमजत नाही.*
आयुर्वेदात शरीराला ‘देश’ असेही म्हटले जाते. या देशातील विविध systems म्हणजे जणू गड आणि किल्ले. या देशावर (शरीरावर) अनेक bacteria, viruses आणि वेगवेगळ्या microbes चे आक्रमण होत असते आणि त्यामुळे विविध गड/किल्ले (systems) प्रभावित होतात. या युद्धात कधी जंतू जिंकतात तर कधी शरीर जिंकते.
सध्या संपूर्ण मानवजातीवर कोरोना व्हायरसने आक्रमण केले आहे. हा विषाणू नैसर्गिक आहे की कृत्रिम हे संदिग्ध असले तरी तो नक्कीच कुशल आहे. कारण वरील व्याख्येनुसार तो शरीर देशातील कुठल्या systems वर आक्रमण करतो यात जगभरातील विविध वैद्यकीय संशोधकांमध्ये मतभेद आहेत. काहींच्या निरीक्षणाप्रमाणे हा विषाणू श्वसनसंस्था (respiratory system) बिघडवतो, म्हणून आत्ययिक अवस्थेत ventilator वापरावे असे सुचवतात तर काहींच्या मते तो रक्तवह संस्था (Circulatory system) प्रभावित करतो. हा व्हायरस रक्तामध्ये गाठी (clots) निर्माण करून रक्ताची oxygen वाहून नेण्याची क्षमता कमी करतो, त्यामुळे हृदय कमकुवत होते आणि अशावेळी ventilator उपयोगी न पडता रक्त पातळ करणार्या औषधाची (blood thinners) योजना करावी लागते. काही जण Corona Positive असूनही त्यांना कुठलीच लक्षणे दिसत नाहीत. एकीकडे 80 टक्के रुग्ण साध्या उपचारानेहि बरे होत आहेत तर धडधाकट माणसे अचानक serious होऊन थेट ICU मध्ये पोहचत आहेत. एकंदरीतच, हा विषाणू कुणावर काय परिणाम करेल याबाबत कुठलीही निश्चितता नाही. म्हणूनच अशा संभ्रमात टाकणार्या शत्रूला प्रत्युत्तर देणारी, त्यालाही गोंधळात टाकणारी युद्धनीती आपल्याला अंगीकारायला हवी. ती म्हणजे आपल्या शरीरातील सर्वच गड/किल्ल्यांना (systems ना ) अभेद्य बनवण्याची. आणि असे अंतर्गत अभेद्य सुरक्षा कवच निर्माण करण्यासाठी उपयुक्त आहे आयुर्वेदातील च्यवनप्राश. कसे ते पाहूच…
————————————————————-
वेलदोडा किंवा वेलची ( cardamom )
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हिच्या फळास वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची किंवा एला असेही म्हणतात.
वेलदोडा किंवा वेलचीचा वापर आपल्या देशात हजारो वर्षांपासून केला जात आहे. वेद व पुराणांसारख्या भारतीय ग्रंथांमध्ये विविध अनुष्ठाने, वैद्यकीय उपचार पद्धतींमध्ये वेलदोड्याच्या वापराचे उल्लेख आहेत. वेलदोडा हे भूक वाढवणारे व पाचक गुणाचे औषध आहे असे मानले जाते.
वेलचीमध्ये लोह, व्हिटॅमिन सी, जीवनसत्व ब गटातील एक महत्वाचा घटक आहे. लाल रक्त पेशी निर्मितीत एक महत्वाची भूमिका वेलची बजावते. यात अँटी-ऑक्सिडायझिंग घटक देखील असतात जे रक्ताभिसरण सामान्य करण्यात मदत करतात जे उच्च रक्तदाब रुग्णांसाठी फायदेशीर आहे.
अन्न पचण्यासाठी वेलची मदत करते. तोंडातील किंवा श्वसनाबाबत दुर्गंधी असेल तर ती दूर होते.
वेलचीमध्ये अँटी बॅक्टिरियल गुण आहे यामुळे खोखला, सर्दी, छातीत होणारा कफ दूर करण्यास मदत होते .
Additional Reference :
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC6278479/
————————————-
जेष्ठमध (Glycyrrhiza glabra)
ज्येष्ठमध चवीला गोडसर, पण कफ कमी करणारे बलवर्धक औषध आहे.
ज्येष्ठमधाचे मूळ औषधात वापरले जाते . याचे जलज जेष्ठमध व स्थलज जेष्ठमध हे दोन प्रकार आहेत . ज्येष्ठमधाचे मूळ गोडसर चवीच असत, हे प्रमाण ग्लिसिरिझिन या घटकांवर ठरते .
ग्लिसिरिझिन श्वास नलिकेतील संसर्ग दूर करायला मदत करत असल्यामुळे, कोविड संदर्भातील उपचार पध्दतीसाठी यावर सध्या मोठया प्रमाणात संशोधन केल जात आहे .
ज्येष्ठमधाच्या वापराने डोळ्यांशी निगडीत विकार, तोंड येणे, घसा खराब असणे, दम लागणे, हृदयरोग, तसेच जुन्या जखमांच्या उपचारामध्ये अतिशय चांगला गुण येतो. अशक्तपणा कमी करणारे म्हणजे शक्तिवर्धक असे हे ज्येष्ठमधाचे अनेक उपयोग आहेत .
Glycyrrhizin: An alternative drug
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC7311916/
Traditional Chinese Medicine – Glycyrrhizin from Glycyrrhizae radix
https://www.ijbs.com/v16p1708.htm
एस जी फायटो च्यवनप्राश मधील एक घटक – मनुका
द्राक्ष ही एक वेलवर्गातील वनस्पती आहे. याच्या दोन जाती आहेत: पिवळी द्राक्षे व काळी द्राक्षे. मनुका किंवा बेदाणा (plum) ही अर्धवट वाळवलेली द्राक्षे असतात. काळ्या बेदाण्यांना मनुका म्हणतात.
काळ्या मनुकांमध्ये लोह आणि पोटॅशियमचं प्रमाण अधिक असतं त्यामुळे हिमोग्लोबीन, नियमित येणारा थकवा यांसारख्या समस्या भेडसावत नाहीत. शरीरातील रक्ताभिसरण चांगलं होतं.
मनुकांमध्ये कॅल्शियम असतं त्यामुळे हाडं मजबूत होतात. अशक्तपणा, अॅनिमियासारख्या आजारांवर मनुका गुणकारी आहेत. मनुकांमुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.
मनुकांमधील अँटीऑक्सिंड्टसमुळे गंभीर आजारांपासून वाचता येते व तुम्ही बऱ्याच रोगांना दूर ठेवू शकता .
संदर्भ : –
भारतीय संस्कृती वाङ्मयात द्राक्षाचे उल्लेख आढळतात. चरकसंहिता व सुश्रुत संहिता यातील संदर्भानुसार, मनुकांचा वापर आयुर्वेदाच्या उपचार पध्दतीमध्ये 1356-1220 इ.स.पूर्वी केलेला आढळतो .
http://www.fao.org/3/x6897e/x6897e06.htm
कौटिलीय अर्थशास्त्र , कौटिल्याने रचलेला इ.स.पू. चौथ्या शतकातील संस्कृत ग्रंथ. या ग्रंथात द्राक्षवेल लागवड व वापर या संदर्भातील उल्लेख आढळतात. या ग्रंथात राजकारण ,तत्वज्ञान , अर्थशास्त्राचे अनेक महत्त्वाचे नियम सांगितले आहेत .
https://vishwakosh.marathi.gov.in/26947/
एस जी फायटो च्यवनप्राश मधील एक घटक – पुनर्नवा
पुनर्नवा अर्थात घेटुळी ( Boerhavia diffusa)
ही वनस्पती हृदयाच्या उत्तम आरोग्यासाठी उपयुक्त आहे. या वनस्पतीमुळे लघवीच्या दर्जात आणि प्रमाणात सुधारणा होते. सूज येणं, पोटात पाणी होणं (जलोदर) यांसारखे विकार कमी होतात. रक्तातील पाणी कमी करून वाढलेला द्रवांश काढून टाकण्याचं कार्य पुनर्नवा करते. बहुगुणी असल्याने अनेक औषधांमध्ये पुनर्नवा या वनस्पतीचा समावेश केलेला आढळतो .
ग्रीष्म ऋतूत ही वनस्पती पूर्णपणे वाळून जाते आणि वर्षा ऋतूत पुन्हा उगवते, म्हणून हिला ‘पुनर्नवा’ असं म्हणतात. शरीरातील प्रत्येक पेशीला पुनुरुज्जीवन तसेच नवंचैतन्य प्राप्त करून देते .
Additional Reference :
https://www.hindawi.com/journals/bmri/2014/808302/
नागरमोथा ( लव्हाळे) , (Cyperus rotundus) “Nut grass”
नागरमोथा हे एक सुगंधी औषध आहे. नागरमोथ्याच्या बारीक खोडाला काही ठिकाणी उभट, लंबगोलाकार कंद येतात. त्यातून वासाचे दाट तैलार्क निघतो. या तैलार्कात स्निग्ध अम्ले असल्यामुळे त्यास सुगंध येतो. ह्याच्या सुगंधी गुणामुळे कृमीनाशक म्हणूनही हे काम करते.
आतड्यांना होणारी दुखणी बरी करण्यासाठी उपयोग केला जातो. ताप आणि लघवीची दुखणी ह्यावर ह्याचा उत्तम उपयोग होतो.
Reference –
https://link.springer.com/article/10.1007/s13205-018-1328-6
कवचबीज
कपिकच्छू – Mucuna pruriens कपिकच्छूच्या बियांना कवचबीज म्हटले जाते. कपिकच्छूच्या शेंगांचा स्पर्श झाला असता त्या जागी खाज सुटते, म्हणून हिला खाजकुहिली म्हणतात. हा एक वेल असतो. कवचबीज तिन्ही दोषांना संतुलित करते. हे एक उत्तम पौष्टिक द्रव्य आहे विशेषतः शुक्रधातूची शक्ती वाढवते .
कवच बीज चा वापर हा रोग उपचार पध्दती मध्ये नियंत्रण, प्रतिबंध आणि सुधारणेसाठी होतो.
कवच बीज चा उपयोग पार्किंसंस , स्नायू दुखणे, जंत उपद्रव, संधिवात , परजीवी संसर्ग इ. करिता विविध आयुर्वेदिक औषधी बनवण्यासाठी होतो .
Additional Reference :
https://www.intechopen.com/chapters/60608
——————————————————
गुळवेल (Gulvel)
रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयोग केला जातो. चरक संहितेमध्ये गुळवेलीला रसायनकल्प असे म्हंटले आहे. रसायनकल्प असल्याने हे बुध्दीवर्धक आणि आयुवर्धक आहे.
मराठी नाव- गुळवेल, अमृता, अमृतवल्ली, गुडूची, गरोळ आणि वारूडवेल गुळवेल किंवा गुडूची (शास्त्रीय नाव: Tinospora cordifolia, टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया) हृदयाच्या आकाराची पाने म्हणून कॉर्डिफोलिया हे नाव पडले आहे. .
रक्तातील दोष नाहीसे करून, त्वचारोग कमी करण्यासाठी उपयोगी आहे , शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. संधीवात व अन्य वात व्याधींवर उपयोगी आहे.
गुळवेल ही सदैव अमर राहणारी वेल आहे आणि ह्याचे अगणित फायदे आहेत. जमिनीमधील पाण्याची पातळी कितीही कमी झाली तरी ही वनस्पती सुकत नाही.
“गुळवेल एक नैसर्गिक अमृतकुंभ .!” असा उल्लेख या वनस्पतीबाबत बऱ्याच ऋषींनी आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये केलेला आढळतो.
हिरडा
हिरडा स्वास्थ्यसंवर्धक आणि रोगनाशक आहे.
हिरडा या वनस्पतीला संस्कृत भाषेत अनेक नावे आहेत. हरीतकी – शंकराच्या घरात (हिमालयात) उत्पन्न होणारी, सर्व रोगांचे हरण करते. हेमवती, हिमजा – हिमालय पर्वतावर उत्पन्न होणारी.
अभया – हिरड्याचे नित्य सेवन केल्याने रोगाचे भय राहत नाही.
कायस्था – शरीर निरोगी, धष्टपुष्ट करणारी.
पाचनी – पाचन करणारी.
प्रपथ्या – पवित्र करणारी.
प्रमथा – रोगांचे समूळ उच्चाटन करणारी.
श्रेयसी – श्रेष्ठ.
प्राणदा – जीवन देणारी.
Reference :
https://en.wikipedia.org/wiki/Terminalia_chebula
कृष्णागृ
शरीराची रोग प्रतिकार क्षमता वाढवणारे आणि भरपूर अँटी-ऑक्सिडंट्स ने परिपूर्ण . शरीराच्या अंतर्गत जखमा लवकर भरून येण्यास मदत करते .
——————————————————————–
रोग प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या ४० वनौषधींचे मिश्रण !
#Immunity #boostImmunity #COVID19 #CovidImmunity
गायीच्या तुपात मधूर, पित्तशामक आणि शुक्रधातूंचे पोषण करणारे घटक असतात. तुपाच्या सेवनाने शरीर बळकट आणि निरोगी होण्यास मदत होते. त्वचा, डोळे, हाडं यासह शरीराच्या अनेक भागांसाठी गायीचे तूप लाभदायी आहे . शरीराची झीज भरून काढण्यासाठी गायीचे तूप फायदेशीर ठरते. आयुर्वेदात तुपाला सात्विक अन्नाचा दर्जा देण्यात आला आहे.
मध
मध – च्यवनप्राश मधील एक महत्वाचा घटक आहे. शरीराची रोग प्रतिकार क्षमता वाढवणारे परिपूर्ण नैसर्गिक द्रव्य