चिकुनगुनिया हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप (CHIKV)विषाणूंमुळे होतो. एडीस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्याव्दारे तो प्रसारित केला जातो. रोगाचे पहिले निदान १९५३ मध्ये टांझानिया येथे झाले.
ताप येणे, तसेच तोंड, पाठ, पोट येथे पुरळ उठणे ही चिकुनगुनियाची लक्षणे आहेत. या रोगाचा संसर्ग झाल्यास सांधे प्रचंड दुखतात. त्यामुळे रुग्णांना हालचाल करताना त्रास होतो, सांध्यांना सूज येते. रोग बरा झाला, तरी ही लक्षणे कमी होण्यास काही आठवडे लागतात. काही रुग्णांमध्ये दीर्घ संधिवाताची लक्षणे दिसतात. स्नायू, कंबर, डोके दुखणे, प्रकाशाकडे पाहताना त्रास होणे आदी लक्षणेही आहेत.
चिकनगुनियाची लक्षणे जरी डेंग्यूसारखी असली तरीही haemorragic fever ची अवस्था मात्र या रोगात त्यात जवळजवळ कधीच दिसत नाही. त्यामुळे चिकुनगुनियामुळे सहसा मृत्यू ओढवत नाही.
https://mr.wikipedia.org/s/602
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
चिकनगुन्याची लक्षणे सामान्यपणे संसर्ग झालेला डास चावल्यानंतर ३ ते ७ दिवसात दिसू लागतात. सर्वसाधारणपणे चिकनगुन्या हा प्राणघातक नसतो. अनेक रुग्ण हे आठवड्याभरात बरे होतात. पण, काही रुग्णांमध्ये सांधेदुखी आणि अंगदुखी पुढे अनेक महीने किंवा वर्षभरसुद्धा त्रासदायक ठरू शकते.
खाली दिलेली लक्षणे तुम्हाला जाणवल्यास दुर्लक्ष करू नका. त्वरित तुमच्या डॉक्टरांना भेटून सल्ला घ्या. रक्त तपसाणीद्वारे चिकनगुण्याच्या संसर्गाची निश्चिती होऊ शकते.
चिकनगुन्याचा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला प्रत्यक्ष संपर्काने होत नाही. चिकनगुन्याचा विषाणू हा इडीस इजिप्ती किंवा इडीस अल्बोपिक्ट्स या जातीच्या डासाद्वारेच मानवामध्ये संक्रमित होऊ शकतो.
एकदा शरीरात संक्रमित झाल्यावर हा विषाणू मानवी रक्तात ५ ते ७ दिवस राहतो. या काळात त्या व्यक्तीला चावणारा कोणताही इडीस इजिप्ती किंवा इडीस अल्बोपिक्ट्स डास स्वतः संक्रमित होऊन इतर अनेक माणसांना आपल्या चावण्याने बाधित करू शकतो.
डेंग्यू हा चिकनगुन्यासारखाच डासामुळे पसरणारा विषाणूजन्य आजार (Viral Disease) आहे. (काहीजण याला “डेंगी” असेही म्हणतात). सामान्यपणे विषाणू (Virus) शरीरात संक्रमित झाल्यावर ३ ते ७ दिवसात डेंग्यूची लक्षणे दिसू लागतात. चिकनगुन्याप्रमाणेच डेंग्यू सुद्धा प्राणघातक रोग नाही परंतु, डोळ्याच्या मागे होणाऱ्या तीव्र वेदना, तीव्र सांधेदुखी यासारख्या लक्षणांचा अतिशय त्रास होऊ शकतो. डेंग्यूची बरीचशी लक्षणे ८-१० दिवसात नाहीशी होतात. पण काही रुग्णांना सांधेदुखी आणि अंगदुखीचा त्रास पुढे कित्येक महिने होऊ शकतो.
म्हणूनच, पुढील लक्षणे असल्यास दुर्लक्ष किंवा टाळाटाळ न करता डॉक्टरकडून पूर्ण तपासणी करून घेणे आणि त्यांनी सुचवलेल्या तपासण्या करून घेणे आवश्यक असते. वैद्यकीय सल्ल्याशिवाय स्वयं उपचार करणे घातक ठरू शकते.
चिकनगुन्या आणि डेंग्यू या दोन्ही आजारावर उपयुक्त अशी विशिष्ठ औषधे नाहीत. तसेच या रोगासाठी कोणत्या लसीही अजून उपलब्ध नाहीत. या रोगावर लक्षणानुसार उपचार केले जातात. ते सुद्धा वैद्यकीय निरीक्षणाखाली. एकंदर, या रोगांशी लढण्यासाठी योग्य युद्धनीती म्हणजे प्रतिबंध.
प्रतिबंधाचे योग्य उपाय :
– डासांचे चावे टाळणे
– डासांची पैदास होणाऱ्या जागांचा बंदोबंस्त करणे
– वैयक्तिक व्याधिप्रतिकारक्षमता वाढवणे
साचलेले किंवा तुंबलेले पाणी, स्वच्छ असो व अस्वच्छ, डासांची पैदास वाढण्यासाठी अनुकूल असते. इडीस डास हे स्वच्छ साचलेल्या पाण्यात अंडी घालतात. एका आठवड्यात या अंड्यामधून डासांची पिल्ले बाहेर पडून १० दिवसातच मोठी होतात. म्हणूनच डासांची पैदास रोखण्यासाठी
– घरात किंवा घराबाहेरील परिसरात पाणी साचू देऊ नका.
– घराच्या आजूबाजूला / अंगणात / गच्ची / गॅलरी अशा ठिकाणी रिकाम्या
बाटल्या / डबे / ट्रे / बादल्या, रबरी टायर्स, रिकामी शहाळी अशा वस्तू ठेवू
नका किंवा त्यात पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्या. कारण, अशा
पाण्यात डासांची पैदास हमखास होते.
– वापरात नसलेले पोहण्याचे तलाव, उद्यानातील शोभेच्या रचना यात पाणी साचू
देऊ नका.
डासांपासून घर सुरक्षित ठेवण्यासाठी इडीस डासांची पैदास तसेच त्यांच्या घरातील प्रवेशावर निर्बंध घालणे आवश्यक आहे, म्हणूनच,
* घरातील पाण्याच्या टाक्या, पिंप तसेच पाणी साठवण्याच्या इतर वस्तू झाकून ठेवाव्या
* पाण्याची टाकी भरून वाहू देऊ नका.
* झाडांच्या कुंड्याखालील ट्रे, पक्षांसाठी ठेवलेली पाण्याची भांडी, फेंग शुईच्या वस्तू यामधील पाणी शक्यतो दर तीन दिवसांनी बदलावे.
* घरातील वातानुकूलन यंत्रे स्वच्छ आणि कोरडी ठेवावीत.
* डास घरात शिरू नयेत यासाठी घराच्या दारे-खिडक्यांना जाळ्या लावाव्यात
* घर व घराच्या परिसरात नियमितपणे, विशेषतः साथीच्या काळात डास प्रतिबंधक फवारणी करून घ्यावी.
डासांच्या चावण्यापासून स्वतःला सुरक्षित ठेवा. त्यासाठी,
* पूर्ण बाह्यांचे, पूर्ण लांबीचे कपडे वापरा.
* झोपताना छिद्र नसलेल्या मच्छरदाणीचा वापर करा.
* शक्यतो, नैसर्गिक व केमिकल विरहित डास प्रतिरोधके (mosquito repellents) वापरा.
* अंगावर डास प्रतिरोधक (mosquito repellents) मलम / लोशन लावा.
* या सर्व उपाययोजना चिकुनगुन्या व डेंग्यूच्या रुग्णाच्या बाबतीतही कडकपणे पाळणे आवश्यक आहे. कारण, सुरवातीच्या दिवसात या रुग्णांच्या रक्तामध्ये Virus ऍक्टिव्ह असतो व या रुग्णांना चावण्याने डास संक्रामक होऊ शकतो.
* एडिस डास हे सामान्यतः दिवसा चावतात, त्यामुळे दिवसाही सावधगिरी बाळगणे आवश्यक असते.
चिकनगुन्या आणि डेंग्यू या दोन्ही आजारावर विशिष्ठ उपचार किंवा लसीकरण उपलब्ध नाही. यामुळे या आजारांची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, तंतोतंत पाळावा आणि भरपूर विश्रांती घ्यावी.
डेंग्यूच्या एका प्रकारात प्लेटलेट्स (रक्तस्त्राव थांबवण्याऱ्या पेशी) अचानक कमी होतात. वेळीच योग्य उपचार न केल्यास या रोगात Dengue Shock Syndrome (DSS) होऊन मृत्यूही ओढवू शकतो. स्वयं उपचाराने विशेषतः ऍस्पिरिन, आयब्रुप्रोफेन, स्टेरॉईड सारखी औषधे घेतल्यास रक्तस्रावाचा धोका वाढून गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.
कमकुवत रोगप्रतिकारक्षमता असणाऱ्या व्यक्ती साथीच्या आजारांनी लवकर बाधित होतात. उत्तम प्रतिकारक्षमता व्यक्तीला अनेक संक्रामक रोगापासून वाचवते. आरोग्यदायी जीवनशैली, नियमित व्यायाम, योग्य आणि संतुलित आहार यामुळे रोगप्रतिकारकक्षमता वाढवता येते. चिकनगुन्या आणि डेंग्यूमधील आयुर्वेद उपचारांनी शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक्षमता वाढते शिवाय, या आजारांची तीव्रता आणि त्यांचे उपद्रव (Complications) देखील कमी होतात. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आयुर्वेद तज्ञांचे मार्गदर्शन जरूर घ्या.
आयुर्वेदशास्र संसर्गजन्य रोगांचा सर्वांगीण विचार करते, प्रतिबंधापासून ते उपद्रवापर्यंत रोगाच्या प्रत्येक अवस्थेत. आयुर्वेदात वर्णन केलेल्या विविध वनस्पती आणि औषधी या चिकनगुन्या आणि डेंग्यू सारख्या रोगांशी लढण्यासाठी सक्षम बनवतात.
आयुर्वेदानुसार, तापामध्ये शरीराचा अग्नी (पचनशक्ती आणि चयापचय) मंद होतो. कमकुवत पचनशक्ती आणि अपूर्ण चयापचयामुळे आम (विषमय घटक) तयार होऊन ते शरीरभर पसरतात ज्यामुळे टॅप, अंगावर चट्टे आणि विविध अवयवामध्ये वेदना होतात. हे विषमय घटक सांध्यामध्ये सूज, जखडलेपणा, आणि तीव्र वेदना निर्माण करतात.
आयुर्वेदातील अनेक वनस्पती आणि औषधे पचन आणि चयापचय सुधारून शरीरातील विषमय घटक दूर करतात. यामुळे टॅप, उलटी, मळमळ, वेदना आणि चट्टे कमी होतात. काही विशिष्ठ आयुर्वेदिक औषधे सांध्यामधील विषारी घटकांना निष्प्रभ करून सांध्याच्या वेदना आणि सूज कमी करतात. काही वनस्पती प्लेटलेट्सची संख्या वाढवून रक्तस्रावाचा धोका दूर करतात. अशाप्रकारे, आयुर्वेद चिकनगुन्या आणि डेंग्यू मध्ये परिपूर्ण आणि प्रभावी उपचार योजना ठरू शकते.
ताप आणि अनेकविध रोगांच्या आयुर्वेदिक उपचारात पचन आणि चयापचय व्यवस्थित रहावे तसेच आम (विषारी घटक) उत्पन्न होऊ नये यासाठी काही गोष्टींचे पालन करावे लागते तर काही गोष्टी कटाक्षाने टाळाव्या लागतात. सर्व लक्षणे आणि उपद्रवांचे पूर्णपणे निरसन होईपर्यंत आहार-विहाराचे काही काटेकोर नियम पाळावे लागतात.
– पचनसंस्थेवर ताण येऊ न देणे.
– वेदना वाढवण्यास कारणीभूत होणारा वात वाढू न देणे
– पुढील संभाव्य उपद्रव (कॉम्प्लिकेशन) टाळणे
– लवकरात लवकर आरोग्य आणि शारीरिक ऊर्जा यांची पुनः प्राप्ती होणे.